पाव भाजी कशी करतात? स्टेप बाय स्टेप सोपी रेसिपी घरच्या घरी |
पाव भाजी ही भारतीय स्ट्रीट फूड मधील अत्यंत लोकप्रिय व चवीष्ट अशी डिश आहे. मुंबई शहरात तुम्हाला गल्ली गल्लीत पाव भाजी ची दुकाने पहावयास मिळतील. पाव भाजी हा असा पदार्थ आहे की तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतो. त्यामुळे तुम्ही घरी सुद्धा सहज पाव भाजी बनवू शकता. परंतु बऱ्याच जणांना माहीत नसते की बाजारात भेटते तशी चमचमीत पाव भाजी कशी करतात? तेच आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही अगदी सहजपणे बाजारात भेटते तशी पावभाजी घरच्या घरी तयार करु शकता.
पाव भाजी ही विविध भाज्या मॅश करून त्याच्यात विविध मसाले वापरून तयार केली जाते. त्यामुळे भाजीला अप्रतिम चव प्राप्त होते. व विविध भाज्यांचा वापर केल्यामुळे ती आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर ठरते. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात झटपट बनणारी पाव भाजी कशी करतात?
पाव भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients For Making Pav Bhaji)
- बटाटे 3 मध्यम आकाराचे
- फ्लॉवर 1 वाटी
- गाजर ½ वाटी
- मटार 1 वाटी
- शिमला मिरची 1 मध्यम आकाराची
- टोमॅटो 3 मोठे बारीक चिरलेले
- बीट 1 मध्यम आकाराचे
- कांदा 2 मोठे बारीक चिरलेले
- हिरवी मिरची 2-3
- ताजी कोथिंबीर 3 टेबलस्पून
- लिंबू 1
- आले 1 इंच
- लसूण 4-5 पाकळ्या
- लाल मिरची पावडर 1 चमचा
- पाव भाजी मसाला 2 चमचा
- हळद पावडर ¼ चमचा
- जिरे ½ चमचा
- बटर 2 चमचे
- तेल 2 चमचे
- मीठ चवीनुसार
- पाणी आव्यकतेनुसार
- पाव 8
पाव भाजी बनवण्याची पद्धत (Method Of Making Pav Bhaji)
- बटाटा, फ्लॉवर, गाजर, मटार शिमला मिरची व बीट या भाज्या आपल्याला उकडवून घ्यायच्या आहेत. त्यासाठी भाज्यांचे छोटे तुकडे करून भाज्या प्रेशर कुकर मध्ये टाकून घ्या. व सोबत ½ वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून कुकराला दोन शिट्या काढून घ्या.
- कूकर थंड झाला की शिजलेल्या भाज्यांना स्मॅशर च्या साहाय्याने किंवा चमच्याचा वापर करून स्मॅश करुन घ्या.
- आता एका कडईत तेल किंवा बटर टाकून गॅस मध्यम आचेवर ठेवा. बटर गरम झाले की त्यात जिरे टाका व जिरे चांगले तडतडू द्या.
- जिरे तडतडले की बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्या.
- दोन ते तीन मिनिटांनंतर कांदा मऊ झाला की आले लसूण पेस्ट आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून आलं लसुणचा कच्चा फ्लेवर जाईपर्यंत फोडणी चांगली परतून घ्या.
- आता बारीक चिरलेले टोमॅटो टाका. व सोबतच हळद पावडर आणि लाल मिरची पावडर टाकून टोमॅटो मऊ होईपर्यंत फोडणी चांगली परतून घ्या.
- टोमॅटो मऊ झाला की पाव भाजी मसाला आणि मीठ टाकून पुन्हा एकदा मसाला 1 ते 2 मिनिटांसाठी चांगला परतून घ्या.
- मसाल्याला तेल सुटले की आपण ज्या भाज्या उकडवून स्मॅश केल्या होत्या त्या मसाल्यात घालुन व्यावस्थीत परतून घ्या.
- भाजी व्यवस्थीत परतली गेली की आवश्यकतेनुसार पाणी टाकून भाजी गॅस मध्यम आचेवर ठेवून 10 मिनीटे उकळवून घ्या. जर तुम्हाला भाजी जास्त घट्ट वाटत असेल तर आवश्यकतेनुसार पाणी टाकून मिक्स करावे.
- सर्वात शेवटी पाव भाजीची चव तपासून पाहा. व आवश्यक असल्यास मीठ किंवा मसाले आपल्या आवश्यतेनुसार वाढवा.
- आता भाजीची चव आणखी वाढवण्यासाठी 1 चमचा बटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून गॅस बंद करावा आणि भाजी झाकून ठेवावी.
- अशा प्रकारे आपली पाव भाजीची भाजी तयार आहे.
पाव भाजी बरोबर खाण्यासाठी पाव कसा टोस्ट करावा? (How To Toast Bread To Eat With Pav Bhaji?)
आता आपण भाजी बरोबर द्यायचे पाव तयार करुण घेऊया. त्यासाठी चाकूच्या साहाय्याने पावाला मधून कापुन घ्या. तवा तापत ठेवून तव्यावर थोडे बटर, पाव भाजी मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून त्यावर पाव ठेवा आणि पाव क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्या. किंवा तुम्ही नुसते बटर लावून देखील पाव भाजू शकता.
पाव भाजी कशी सर्व्ह करावी? (How To Serve Pav Bhaji?)
- पाव भाजी सर्व्ह करण्यासाठीच पावभाजी वाढण्याची ताट येते ते घ्या किंवा तुमच्या घरी जे ताट उपलब्ध असेल ते घ्या.
- आता त्या ताटात पाव भाजी ची भाजी सर्व्ह करण्यासाठीच छोटी डिश किंवा वाटी घ्या. व त्यात पावभाजीची भाजी काढून घ्या.
- आता सर्व्ह केलेल्या भाजीवर कोथींबीर टाकून घ्या. त्यामुळे दिसायला सुंदर दिसेल.
- व तुम्ही गरमा गरम भाजीवर बटर घालू शकता. त्यामुळे भाजी चवीष्ट लागते.
- आता ताटात बारीक चिरलेला कांदा, व लिंबाची फोड ठेवा. कांदा व लिंबू मुळे भाजीची चव अप्रतिम लागते.
- अशा प्रकारे तुम्ही गरमा गरम पाव भाजी सर्व्ह करु शकता.
पाव भाजी बनवण्यासाठी काही टिप्स (Some Tips For Making Pav Bhaji)
- पाव भाजी बनवण्यासाठी चांगल्या ब्रँड चा पाव भाजी मसाला खरेदी करावा. त्यामुळे पाव भाजी चविष्ट बनेल.
- पाव भाजी बनवताना ताज्या भाज्यांचा वापर करावा.
- पाव भाजी बनवताना मसाले नीट परतावेत त्यामुळे पाव भाजी चविष्ट बनण्यास मदत होईल.
- पाव भाजी मध्ये बीटाचा वापार नक्की करावा त्यामुळे तुम्हाला फूड कलर टाकायची गरज भासणार नाही. बीट मुळे पावभाजी ला चांगला गडद रंग येईल.
हे देखील वाचा (Read This Also)
निष्कर्ष (Conclusion)
अशा प्रकारे बाजारात मिळणारी पाव भाजी तुम्ही आम्ही सांगितलेल्या रेसिपी नुसार अगदी सहजपणे तुमच्या घरी बनवु शकता. ताज्या भाज्यांचा वापर केल्यामुळे भाजीला अप्रतिम चव प्राप्त होते. तर तुम्ही देखील पाव भाजी घरी बनवुन पाहिल्यावर तुमचे अनुभव आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. तुमच्या कॉमेंट वाचून आम्हला आनंद होईल. आणि त्यातून आम्हाला भरपूर रेसिपी तयार करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.