मटर पनीरची भाजी कशी बनवायची? नवशिक्यांसाठी झटपट रेसिपी |
मटर पनीरची भाजी ही भारतीय खाद्यसंस्कृतीत सर्वात लोकप्रिय अशी डिश आहे. ह्या भाजीचे क्रीमी टेक्चर व गोडसर चव व मऊसर पनीरचे तुकडे यामुळे मटर पनीरची भाजी सगळ्यांनाच आवडते. मटर पनीरची ही भाजी आपल्याला विशिष्ठ कार्यक्रमांत देखील मेनू मध्ये पाहायला मिळते. मटर पणीरची भाजी झटपट बनत असल्याने आपल्याला ती रोजच्या जेवणात देखील बनवता येते. परंतु बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की चवीष्ट अशी मटर पनीरची भाजी कशी बनवायची? त्याचेच उत्तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला देणार आहोत.मटर पनीरची भाजी ही पनीर व मटार वापरल्याने पौष्टिक बनते. पनीर मधून प्रोटीन व मटर मधून मुबलक फायबर आपल्याला मिळते. रेस्टॉरंट मध्ये मटर पनीरची भाजी खाल्ली की ती खूप चवीष्ट लागते. तितकीच स्वादिष्ट अशी मटर पनीरची भाजी कशी बनवायची? ह्याची रेसिपी आम्ही तुम्हाला सविस्तर पने सांगणार आहोत. त्यामुळे तुम्ही देखील क्रीमी मटर पनीरची भाजी आपल्या घरी अगदी सहज बनवू शकता.
मटर पनीरची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients For Making Matar Paneer Vegetable)
- पनीर 200 ग्राम
- मटर 1 वाटी
- तूप किंवा तेल 2 चमचे
- कांदे 2 मध्यम बारीक चिरलेले
- टोमॅटो 2 मोठे बारीक चिरलेले
- लसूण 3-4 पाकळ्या
- आलं ½ इंच
- जिरे 1 चमचा
- लाल मिरची पावडर 1 चमचा
- गरम मसाला 1 चमचा
- धणे पावडर ½ चमचा
- कस्तूरी मेथी ½ चमचा
- हळद पावडर ¼ चमचा
- ताजी कोथिंबीर 2 आवश्यकतेनुसार
- दही ¼ वाटी
- दूध ½ वाटी
- मीठ चवीनुसार
- पाणी आवश्यकतेनुसार
मटर पनीर बनवण्याची पद्धत (Method Of Making Matar Paneer)
- मटर पनीर बनवण्यासाठी कडई मध्यम गॅस वर ठेवून कडई तापली की त्यात तूप किंवा तेल टाकून घ्या. तूप टाकल्याने भाजीचा स्वाद वाढेल.
- तूप गरम झाले की त्यात जिरे टाकून घ्या. जिरे चांगले तडतडले पाहिजे. त्यामुळे फोडणी खमंग बनते.
- जीरे परतले की बारीक चिरलेला कांदा टाकून कांदा सोनेरी रंगाचा होईपर्यंत व्यवस्थीत परतून घ्या.
- कांदा सोनेरी रंगावर परतला गेला की त्यात आलं लसूण पेस्ट टाकून त्याचाही कच्चा स्वाद जाईंपर्यंत परतून घ्या.
- आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून टॉमॅटोला तेल सुटेपर्यंत परतून घ्या. तुम्ही टोमॅटो टाकला की झाकण ठेवू शकता. त्यामुळे टोमॅटो लवकर मऊ होइल.
- दोन ते तीन मिनिटांत टोमॅटो तून तेल वेगळे झालेले दिसेल. आता लाल मिरची पावडर, हळद पावडर, धणे पावडर आणि गरम मसाला टाकून एक ते दोन मिनिटे मसाले नीट परतून घ्या.
- आता गॅस बारीक करुन फेटलेले दही टाकावे. व मसाल्या सोबत व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. नाहीतर दही फाटू शकते.
- मसाला नीट परतून झाला की मटर आणि पनीर टाकून मिक्स करून घ्या. मिक्स करताना सावकाश करावे अन्यथा पनीर तुटू शकते.
- पनीर मासाल्याने नीट कोट झाले की दूध किंवा पाणी टाकून तुम्हाला ग्रेवी जितकी घट्ट किंवा पातळ हवी असेल त्यानुसार दूध किंवा पाणी तुम्ही टाकून घ्यावे. तुम्ही आर्धे दूध व आर्धे पाणी एकत्र करून टाकू शकता. दूध टाकल्याने चव वाढते.
- आता कडई वर झाकण ठेवून गॅस मध्यम ठेवावा व 5 ते 7 मिनिटे भाजी व्यवस्थीत शिजवून घ्यावी.
- भाजी शिजवून झाली की कस्तुरी मेथी टाकून घ्यावी. कस्तुरी मेथी टाकल्याने भाजीची चव वाढते.
- सर्वात शेवटी मटर पनीरची चव तपासून पाहा. व आवश्यक असल्यास मीठ किंवा मसाले आपल्या आवश्यतेनुसार वाढवा.
- आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून भाजी झाकून ठेवावी. व गॅस बंद करावा.
- कोथींबीर टाकल्यामुळे भाजी 5 ते 7 मिनीटे तशीच झाकून ठेवावी.
स्वादिष्ट मटर पनीर बनवण्यासाठी टिप्स (Tips For Making Delicious Matar Paneer)
- मटर पनीरची भाजी रीच आणि क्रीमी करावयाची असल्यास भाजीत फ्रेश क्रीम किंवा काजू पेस्ट चा वापर नक्की करावा.
- भाजीत जर तुम्ही पनीर तळून टाकणार असाल तर तळलेले पनीर 3 ते 4 मिनिटांसाठी गरम पाण्यात भिजत ठेवा. त्यामुळे पनीर कडक होणार नाही.
- मटर पनीर च्या भाजीत मटार कच्चे नसावेत. मटर कच्चे असल्यास भाजी चांगली लागत नाही.
- भाजीत तुम्ही ताजे मटर टाकणार असाल तर तुम्ही मटर आधीच शिजवून घेऊ शकता. मटर शिजवून घेताना पाण्यात थोडे मीठ घालून घ्यावे.
मटर पनीर कशासोबत सर्व्ह करावे? (Serving Suggestions For Matar Paneer)
- मटर पनीर तुम्ही गरमा गरम फुलके किंवा तंदूरी रोटी बरोबर सर्व्ह करु शकता. तंदूरी रोटिमध्ये असणारा स्मोकी फ्लेवर बरोबर मटर पनीर अप्रतिम लागते.
- तुम्ही गाजर पराठा, बटाटा पराठा किंवा मेथी पराठा यांबरोबर मटर पनीर ची भाजी सर्व्ह करु शकता.
- जीरा राईस किंवा पुलाव बरोबर तुम्ही मटर पनीर ची भाजी सर्व्ह करु शकता. मटर पनीरच्या ग्रेव्ही मुळे Netflix चव वाढेल.
- तुम्ही नान किंवा चपाती बरोबर देखील मटर पनीरची भाजी सर्व्ह करु शकता.
मटर पनीरची भाजी करताना कोणत्या चुका करू नये? (Common Mistakes To Avoid While Making Matar Paneer Bhaji)
- पनीर जास्त वेळ शिजवू नये. पनीर जास्त वेळ शिजवल्याने ते रब्बर सारखे होऊ शकते व खायला चांगले लागणार नाही.
- ग्रेव्ही खूप जाड किंवा खूप पातळ झाल्यास भाजीची चव बिघडू शकते. यासाठी भाजीत पाणी घालताना थोडे थोडे घालावे.
- मटर पनीरच्या भाजीची चव ही गोडसर असते. त्यामुळे जास्त प्रमाणात मसाले घालू नये. कारण मसाले जास्त झाले तर भाजीला कडवट चव येईल. व त्यामुळे भाजी चांगली लागणार नाही.
- भाजीची ग्रेव्ही करीत असताना जास्त घाई करू नये. कांदा, टोमॅटो आणि मसाले व्यवस्थीत परतून घ्यावे. अन्यथा भाजीला योग्य ती चव येणार नाही.
हे देखील वाचा (Read This Also)
निष्कर्ष (Conclusion)
अशा प्रकारे आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मटर पनीरची भाजी कशी बनवायची? हे पहिले आहे. हा लेख वाचून तुम्ही देखील तुमच्या घरी चवीष्ट अशी मटर पनीरची भाजी बनवू शकता. तर आजच चवीष्ट अशी मटर पनीरची भाजी बनवा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंट करून शेअर करा. आम्ही तुमच्या कमेंट ची वाट पाहत आहोत. धन्यवाद.