पनीर भुर्जी कशी करायची? भात, पोळी किंवा ब्रेडसोबत झकास लागणारी भाजी |

पनीर भुर्जी कशी करायची? भात, पोळी किंवा ब्रेडसोबत झकास लागणारी भाजी |

पनीर भुर्जी कशी करायची? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. त्याचेच उत्तर आजच्या या लेखात आम्ही तुम्हाला देणार आहोत. पनीर भुर्जी हा असा पदार्थ आहे जो झटपट बनतो. घाईच्या वेळी तुम्ही सहजपणे 10 ते 15 मिनिटांत पनीर भुर्जी बनवु शकता. पनीर भुर्जी तुम्ही सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवण किंवा संध्याकाळी कधीही खाऊ शकता. पनीर भुर्जी हा एक पौष्टिक आहार आहे. पनीर भुर्जी बनवण्यासाठी जास्त साहित्य किंवा विशेष असे मसाले लागत नाही. तुम्ही तुमच्या घरात असलेल्या उपलब्ध साहित्या पासून सहज चवीष्ट अशी पनीर भुर्जी बनवु शकता.


पनीर भुर्जी कशी करायची, Paneer Bhurji Kashi Karaychi,

आज मी तुम्हाला ज्या प्रमाणे पनीर भुर्जी बनवायची रेसिपी सांगणार आहे त्या प्रमाणे तुम्ही बनवली तर तुम्ही नेहमी अशीच बनवाल. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात पनीर भुर्जी कशी करायची?


(toc)


पनीर भुर्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य (Ingredients For Making Paneer Bhurji)

  • पनीर 250 ग्रॅम
  • कांदा 1 मोठा बारीक चिरलेला 
  • टोमॅटो 1 मध्यम बारीक चिरलेला 
  • तूप, तेल किंवा बटर 2 चमचा 
  • जिरे 1 चमचा 
  • आलं लसूण पेस्ट 1 चमचा 
  • हिरवी मिरची 1-2
  • लाल मिरची पावडर 1 चमचा 
  • गरम मसाला ½ चमचा 
  • हळद पावडर ¼ चमचा 
  • ताजी कोथिंबीर 2 चमचा 
  • पानी आवश्यकतेनुसार
  • मीठ चवीनुसार


पनीर भुर्जी बनवण्याची पद्धत (Paneer Bhurji Step By Step Cooking Process)

  • कडईत तूप किंवा तेल टाकून गॅस मध्यम आचेवर ठेवा.
  • तूप गरम झाले की त्यात जिरे टाकून जिरे चांगले तडतडू द्या. जिऱ्याचा सुगंध येईपर्यंत जीरे परतून घ्या.
  • आता बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून कांदा हलका सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या.
  • कांदा व्यवस्थीत परतला गेला की आलं लसूण पेस्ट टाकून त्याचा कच्चा फ्लेवर जाईपर्यंत फोडणी व्यवस्थित परतून घ्या.
  • आता बारीक चिरलेला टोमॅटो टाकून झाकण ठेवून टॉमेटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्या. 
  • टोमॅटो मऊ झाला की हळद पावडर, लाल मिरची पावडर आणि मिठ घालून मसाले तेल सुटेपर्यंत परतून घ्या. त्यासाठी 2 ते 3 मिनिटांचा वेळ लागु शकतो.
  • मसाला परतला गेला की किसलेले पनीर टाकून 2 ते 3 मिनिटे मसाल्यात व्यवस्थित परतून घ्या. त्यामुळे पनीर मध्ये मसाल्यांचा स्वाद येईल. 
  • आता गरम मसाला टाकून पनीर भुर्जी पुन्हा एकजीव करून घ्या.
  • आता आपल्याला पनीर भुर्जीला वाफ काढून घ्यायची आहे. त्यासाठी जर पनीर भुर्जी जास्त सुखी वाटत असेल तर थोडेसे पाणी शिंपडून घ्या.
  • आता झाकण ठेवून पनीर भुर्जी 2 ते 3 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्या.
  • सर्वात शेवटी चव तपासून पाहा. व आवश्यक असल्यास मीठ किंवा मसाले आपल्या आवश्यतेनुसार वाढवा.
  • आता बारीक चिरलेली कोथींबीर टाकून गॅस बंद करून घ्या. अशा प्रकारे तयार आहे आपली पनीर भुर्जीची भाजी.


चवीष्ट पनीर भुर्जी बनवण्यासाठी टिप्स (Tips To Make A Perfect Paneer Bhurji)

  • पनीर भुर्जी बनवताना ताज्या पनीरचा वापर करावा. किंवा तुम्ही घरी बनवलेले पनीर देखील वापरू शकता.
  • पनीर ताजे नसल्यास 15 ते 20 मिनीटे पनीर पाण्यात भिजवुन ठेवावे. त्यामुळे पनीर नरम होईल. व पनीर भुर्जी देखील नरम बनेल.
  • पनीर फक्त 2 ते 3 मिनीटे शिजवून घ्यावे. पनीर जास्त शिजवले तर ते लवचिक किंवा कडक होऊ शकते. व भाजी व्यवस्थीत लागणार नाही.
  • पनीर भुर्जी अधिक तिखट व मसालेदार हवी असल्यास मिरचीचे प्रमाण वाढवावे.
  • पनीर भुर्जी मध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार सिमला मिरची, मटार किंवा बारीक चिरलेले गाजर इत्यादी भाज्या देखील टाकू शकता. त्यामुळे पनीर भुर्जी पौष्टिक बनेल.
  • तुम्हाला वाटत असेल की पनीर भुर्जीला एकदम रेस्टॉरंटसारखी चव यावी तर सर्वात शेवटी एक चमचा बटर टाका.
  • पनीर भूर्जीत पनीर जास्त बारीक किसू नये. काही तुकडेमोठे देखील राहिले पाहिजेत. त्यामुळे खाताना लहान मोठे तुकडे बरे लागतात.
  • पनीर भुर्जीला फोडणी देताना तुम्ही तेलाच्या ऐवजी तूप किंवा बटर चा वापर केला तर भाजी आणखी स्वादिष्ट लागेल.


पनीर भुर्जी कशी सर्व्ह करायची (Serving Suggestions For Paneer Bhurji)

  • पनीर भुर्जी सर्व्ह करताना त्याच्यावर सजावटीसाठी कोथिंबीर, किसलेले चीज व लिंबू पिळा त्यामुळे भाजीला अप्रतिम चव येईल.
  • तसेच भुर्जी सोबत तुम्ही बारीक चिरलेला कांदा व लोणचे देखील सर्व्ह करु शकता.
  • पनीर भुर्जी तुम्ही गरमागरम चपाती, फुलका किंवा पराठ्या बरोबर सर्व्ह करू शकता. 
  • पनीर भुर्जी तुम्ही ब्रेड किंवा पाव बरोबर देखील सर्व्ह करु शकता. पाव किंवा ब्रेड देताना प्रथम तो बटर लावून तव्यावर भाजून घ्यावा. म्हणजे खायला चवीष्ट लागतो.
  • पनीर भुर्जी आपल्या रोजच्या जेवणात तुम्ही साईड डिश म्हणून देखील सर्व्ह करु शकता.

हे देखील वाचा (Read This Also)


निष्कर्ष (Conclusion)

तर मित्र मैत्रिणींनो पणीर भुर्जी कशी करायची? या तुम्हाला पडलेल्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर या लेखात सांगितले आहे. पनीर भुर्जी ची ही रेसिपी झटपट तर बनतेच सोबत ती घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. तुम्ही आम्ही सांगितलेली ही पनीर भुर्जीची रेसिपी करून पाहिल्यास तुमचे अनुभव खाली कमेंट्समध्ये नक्की लिहा. तुमचे फीडबॅक आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. धन्यवाद.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.